
लोकमराठी News, इंदापूर ता.02
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि -सहयोग-ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा. लि युनिट नं. ११ महात्मा फुलेनगर (बिजवडी) ता. इंदापूर या साखर कारखान्याचा 36 वा बॉयलर अग्नि प्रदीपन व सन २०२५२६ गळीत हंगाम शुभारंभ सोमवार (ता.03) रोजी संपन्न होणार आहे.
सहकारात नावाजलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये यंदा प्रथमच खाजगी भागीदारीचा समावेश झाला असून यामध्ये बाबुराव बोत्रे यांच्या ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांनी भागीदारी केली असल्याने यंदाचा हंगाम हा नाव सहकार आणि कारभार खाजगी असा संयुक्त होणार असल्याने गेल्या पाच सात वर्षापासून अडखळत अडखळत सुरू असलेल्या कारखान्याला गती मिळणार आहे.
या कारखान्याचा सन २०२५-२०२६ सालचा३६ वा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसेच कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व ओंकार साखर कारखाना प्रा.लि. युनिट नं. १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४,१५ चे चेअरमन आणि अशोक नागरी सहकारी बँक लि, पिंपरी पुणे. यांचे मार्गदर्शक बाबुराव बोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

याबाबत कारखान्याच्या वतीने संचालक मंडळ -श्री. भरत सुरेश शहा, श्री.राजवर्धन हर्षवर्धन पाटील, श्री.शांतिलाल दत्तात्रय शिंदे, श्री.रविंद्र वामन सरडे,श्री. छगन धोंडिबा भोंगळे, श्री.हनुमंत अंकुश जाधव, श्री.रतन हरिश्चंद्र देवकर, श्री.प्रविण यादवराव देवकर, श्री.भुषण प्रकाश काळे,श्री.पराग रमेशराव जाधव, श्री.विश्वास रंगनाथ देवकाते, श्री.निवृत्ती भिकू गायकवाड,श्री.वसंत बरमु जाधव, श्री.प्रदिप विश्वासराव पाटील, श्री.अंबादास विठठल शिंगाडे, श्री.केशव विनायक दुर्गे, श्री.सतिश उध्दव व्यवहारे, श्री.हिरालाल शंकर पारेकर, श्री.वसंत खंडू मोहोळकर, सौ.शारदा कुबेर पवार,सौ.कांचन अशोक कदम, श्री.संपतराव शिवदास बंडगर, श्री.सतीश उत्तमराव काळे, यांचेसह जनरल मॅनेजर श्री.रणजीत तावरे, कार्यकारी संचालक श्री.विजयसिंह दत्तात्रय शिर्के सभासद, ऊस तोडणी व वाहतुकदार, कर्मचारी बंधू अशी निमंत्रण पत्रिका प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
![]()