इंदापूरमध्ये मत्स्य संशोधनाला येणारा अच्छे दिन

जाहिरात

इंदापूरमध्ये मत्स्य संशोधनाला येणारा अच्छे दिन

इंदापूरमध्ये सुरु होणार राज्यातील प्रगत मत्स्य महाविद्यालय

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमराठी News, इंदापूर ता.28

इंदापूर तालुक्याच्या सीमेला लाभलेला नदी भीमा आणि निरा नदीचा किनारा यासह उजनी धरणाचा बॅकवॉटर भाग यामुळे मत्स्य व्यवसायाला असलेली संधी विचारात घेता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्यातून इंदापूर तालुक्यात प्रगत मत्स्य महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे यामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहेत.

याबाबत मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि शाश्वत जलउत्पादन व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात नवीन मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात असून याबाबत तपशील माहिती उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी घेतली. तसेच, महाविद्यालयासाठी आवश्यक जमीन, बांधकाम आराखडा आणि निधी नियोजनाबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून शासनस्तरावर लवकरच यासाठी निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

इंदापूर तालुक्यात स्थापन होणारे मत्स्य महाविद्यालय हे राज्यातील पहिले तंत्रज्ञानाधारित मत्स्य शिक्षण आणि संशोधन केंद्र असणार असून या महाविद्यालयात आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, जलसंसाधन व्यवस्थापन, मत्स्यजन्य उत्पादने प्रक्रिया, निर्यात गुणवत्ता प्रशिक्षण आणि जलचर जैवविविधता संवर्धन या विषयांवर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

या बैठकीला राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, सौर विभागाचे प्रधान सचिव भ विजय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, तर व्ही.सी.द्वारे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.–

कृषिमंत्री भरणे यांनी पाळला शब्द…

मागील आठवड्यात इंदापूर शहरात झालेल्या इंदापूर तालुका कृषी पदवीधरांच्या मेळाव्यामध्ये बोलताना कृषिमंत्री भरणे यांनीइंदापूर तालुक्याला उजनी जलाशयाचा भागात मोठा नैसर्गिक साठा आहे. या माध्यमातून मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तालुक्याच्या दोन्ही बाजूला भीमा आणि निरा नद्या आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल,अशी ग्वाही दिली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ पाठपुरावा करत कृषीमंत्री भरणे यांनी शब्द पाळणे तालुका कृषी पदवीधर संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले.–

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!