
इंदापूर विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीकर यांच्या “मॉलिक्युलर बायोलॉजी व मायक्रोबियल जेनेटिक्स”या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
लोकमराठी News, इंदापूर ता.18
इंदापूर विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण संदीकर यांच्या “मॉलिक्युलर बायोलॉजी व मायक्रोबियल जेनेटिक्स” या पुस्तकाचे प्रकाशन विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या 53 व्या वर्धापनदिन बारामती येते संपन्न झाला.यावेळी विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर येथे प्राचार्य म्हणून काम कार्यरत असलेले डॉ.बाळकृष्ण संदीकर यांनी
लिहिलेल्या “मॉलिक्युलर बायोलॉजी व मायक्रोबियल जेनेटिक्स” या पुस्तकाचे प्रकाशन विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार,प्रतिभा शरद पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, कोषाध्यक्ष युगेंद्र पवार, संस्थेचे विश्वस्त तथा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार,खासदार सुप्रिया सुळे,विठ्ठलदास मनियार यांचेसह विद्या प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान डॉ. संदीकर यांनी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातून 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून मागच्या वर्षी निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
–
![]()