रुई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

जाहिरात

रुई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ


लोकमराठी News, इंदापूर ता.29


इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या उपक्रमाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रुई येथील बाबीर बुवा देवस्थान परिसरातील श्री बाबीरनगरी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा दक्षिण भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रविणकुमार शहा, भाजपा इंदापूर तालुका महामंत्री तानाजी मारकड,ओबीसी सेलचे जिल्हा सचिव आबासाहेब थोरात, भाजपा जिल्हा सोशल मीडिया सहसंयोजक अमोल प्रभुणे, भाजपा इंदापूर उपाध्यक्ष वैभव लावंड, चिटणीस अविनाश मोहिते, सलीम मुलाणी, सचिन लावंड, सामाजिक कार्यकर्ते राजू पाळेकर, देविदास लावंड,माजी उपसरपंच दिपक साळुंखे, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे महिम मोहिते यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते,


याबाबत माहिती देताना आकाश कांबळे म्हणाले, भारतीय जनता पार्टी प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि शेवट मी या तत्त्वानुसार चालणारी जगामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असणारी एकमेव पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी चा उल्लेख केला जातो, देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या लोककल्याणकारी अलौकिक कार्याचा गौरव जगामध्ये होत आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात अनेक आश्वासक लोक कल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत, यामुळे भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता जनमानसात वाढत आहे पार्टी लोककल्याणकारी उपक्रम राबवत आहे, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवण्यात आला.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!