
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंदापूरच्या मारकड कुस्ती केंद्राचे यश
अठरा वजनगटात प्रथम तर चार वजनगटात द्वितीय
लोकमराठी News, इंदापूर ता.16
इंदापूर तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत शहरातील मारकड कुस्ती केंद्राच्या मल्लांनी घवघवीत यश संपादन केले असून स्पर्धेतील तब्बल 18 वजन गटात प्रथम तर चार वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवत कुस्ती केंद्राचे नाव उज्वल केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इंदापूर शहरातील नामांकित पंचकृष्णा मोबाईल शॉपीच्या वतीने रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे माजी अध्यक्ष मोरेश्वर कोकरे यांच्या हस्ते रोग पारितोषिक देण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्र येथे इंदापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्राचे संस्थापक अमोल तोरवे, राष्ट्रीय कुस्ती पंच शरद झोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत अनेक अतितटीच्या कुस्त्या पाहायला मिळाल्या.या स्पर्धेत पैलवान मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली मारकड कुस्ती केंद्राने वर्चस्व राखीत एकूण 18 विविध वजन गटात प्रथम क्रमांक, तर चार विविध वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवले.
यामध्ये 14 वर्षे वजन गटात प्रथम क्रमांक मिळवलेले, पृथ्वीराज जाधव 35 किलो, यश संतोष मारकड 41 किलो, ऋतुराज सुधीर काळे 48 किलो, हर्षल युवराज मारकड 68 किलो, यशराज श्रावण चोरमले 75 किलो, हर्षद श्रावण चोरमले 57 किलो यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
17 वर्षे फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात राजवर्धन संदिपान शेंडगे 45 किलो, समर्थ रामचंद्र पेटकर 55 किलो, सार्थक संतोष मारकड 71 किलो, समर्थ शत्रुघन शिंदे 80 किलो, अनिकेत आबासो चोरमले (45 किलो द्वितीय),तर 19 वर्षे फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये रोहित दिलीप दंगाणे 74 किलो याने प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच 17 वर्षे ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत तेजस भारत गोफणे ५५ किलो, पृथ्वीराज हनुमंत मारकड 51 किलो, माऊली राजेंद्र कचरे 71 किलो.
19 वर्ष वयोगटात आदित्य सुभाष पिंगळे 63 किलो, विशाल विजय कारंडे 82 किलो, यशराज सचिन जाधव 130 किलो, अवधूत व्यवहारे 67 किलो, गणेश धोंडीराम मासाळ 72 किलो यांनी क्रमांक मिळवले.
सर्व विजेत्या मल्लांना इंदापूर येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अँड.मोरेश्वर कोकरे यांच्यावतीने रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.–
![]()