
इंदापूर येथे शनिवारी हरिनाम सप्ताह व माऊली गाथा पारायण सोहळा सांगता समारंभ
लोकमराठी News, इंदापूर ता.12
श्रीगुरु नामदेव आण्णा माळी (वसेकर) पुण्यतिथी उत्सव समिती, इंदापूर आयोजित श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, पंढरपूर-आळंदी २२५ वर्षे फड स्थापना पूर्ती श्रीगुरु नामदेव आण्णा माळी वसेकर यांची ११४ वी पुण्यतिथी निमित्त माऊली ज्ञानोबाराय जन्मोत्सव वर्ष ७५० नामदेवराय समाधी संजीवन वर्ष ६७५ वै. ह.भ.प. जगदेव राऊ जाधव (विणेकरी) आजरेकर फड यांच्या ५वी पुण्यतिथी या निमित्त आयोजित हरिनाम सप्ताह व माऊली गाथा पारायण सोहळासांगता समारंभ निमित्त शनिवार (दि. १३/९/२०२५) रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे (काका माऊली) आजरेकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून नंतर वै. ह.भ.प. गोकुळदासजी शहा (भाई) यांचे स्मरणार्थ शहा परिवार, इंदापूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.तरी या प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा व इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी केले आहे.

![]()