९१ लाख, ६५ हजार, १५६ शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधीचे वितरण

जाहिरात

नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे वितरण
९१ लाख, ६५ हजार, १५६ शेतकऱ्यांना लाभ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी केले प्रतिनिधिक स्वरूपात ऑनलाइन वितरण
लोकमराठी News, मुंबई ता.09
        नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे वाटप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.


      याबाबत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे या उद्देशाने ही योजना राज्य शासनाने, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू केली आहे. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. या योजने अंतर्गत ९१ लाख, ६५ हजार, १५६ लाभार्थी यांना, सुमारे १८९२.६१ कोटींच्या रकमेचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!