आंबेगाव पठार येथे विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

जाहिरात

आंबेगाव पठार येथे विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

‘क्विक हील फाउंडेशन’ व सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

इंदापूर ता.06

आंबेगाव पठार येथे निरामयी एनजीओ येथे झोपडपट्टी भागातील मुलींसाठी ‘क्विक हील फाउंडेशन’ व सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या वतीने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला.

या सत्रामध्ये मधुरा समीर लाकडे आणि पूर्वा नितीन वीर यांनी मुलींना सुरक्षित पासवर्डचा वापर, फिशिंग (फसवणूक मेल), ऑनलाईन फसवणुकीच्या पद्धती, सुरक्षित ब्राउझिंगचे नियम तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच antifraud.ai या ॲपबद्दल सविस्तर माहिती देऊन त्या ॲपचे प्रत्यक्ष डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले.संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या सत्रामुळे मुलींमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढली. संस्थेच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!