
इंदापूर येथील श्री नेहरू सामाजिक मित्रमंडळात महिलांच्या हस्ते महाआरती
आरती ताट सजावट स्पर्धा उत्साहात संपन्न
इंदापूर ता. 06 :
इंदापूर शहरातील मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळख असलेल्या श्री नेहरू सामाजिक मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने सोमवारी सायंकाळी महिलांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती संपन्न झाली. धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि महिलांचा मोठा सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी आयोजित केलेल्या आरती ताट सजावट स्पर्धेला महिला-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविधरंगी फुलांनी, दिव्यांनी, आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी सजवलेले ताट पाहून उपस्थितांची मने भारावून गेली. या स्पर्धेत महिलांनी दाखवलेली कल्पकता व भक्तिभावामुळे परीक्षकांसमोर विजेते ठरवणे कठीण झाले. या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून सायरा आतार व निर्मला कवितके यांनी काम पाहिले.त्यांच्या उपस्थितीबद्दल मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

तसेच सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले यावेळी सहभागी झालेल्या सर्व महिला-भगिनींचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रायोजक यांचे योगदान लक्षणीय राहिले. शेवटी मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व भक्तगणांचे व महिलांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले.

–
स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे –
प्रथम पारितोषिक – मायाताई विंचु
द्वितीय पारितोषिक – वर्षा इंगुळे
तृतीय पारितोषिक – उज्वला गानबोटे
चतुर्थ पारितोषिक – मोक्षदा वाघ
पंचम पारितोषिक – शुभांगी जौंजाळ
![]()