
1 सप्टेंबरपासून दुधाच्या खरेदी दरात वाढ – सोनाई ग्रुपचे चेअरमन दशरथ माने यांची माहिती
इंदापूर ता.29
सोनाई ग्रुपने शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देत 1 सप्टेंबरपासून दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ. दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती सोनाई ग्रुपचे चेअरमन दशरथ माने यांनी दिली.
याबाबत बोलताना दशरथ माने म्हणाले, दुधाचा दर हा नेहमीच मागणी-पुरवठा आणि देश-विदेशातील दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारभावावर अवलंबून असतो. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी सोनाई ग्रुपने कायम पुढाकार घेतला असून, दुध उत्पादकांना योग्य दर मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.अलीकडेच सोनाई प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात मोठ्या उत्पादन क्षमतेचा पावडर प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्लांटमध्ये स्कीम मिल्क पावडर, होल मिल्क पावडर, डेअरी व्हाइटनर पावडर यांसह रेनेट केसिन, अॅसिड केसिन, सोडियम केसिन, व्हे प्रोटीन पावडर, फार्मा लॅक्टोज पावडर, इडेबल लॅक्टोज पावडर, परमिट पावडर, बटर ऑइल, चीज आदी दुग्धजन्य उत्पादने मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. याशिवाय युएचटी (अल्ट्रा हाय ट्रीटमेंट) दूध, जे सहा महिने टिकू शकते, फ्लेवर मिल्क आणि क्रीम उत्पादनाचीही सुरुवात झाली आहे.
या सर्व उत्पादनांचा देशभरातील बाजारपेठेत विक्री होत असून, जगभरातील विविध देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्यामुळे देशातील दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसोबतच हजारो युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सोनई परिवाराच्या वतीने शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली जाते.शेतकरी बांधवांच्या जनावरांना योग्य व परिपूर्ण आहार मिळावा आणि त्यातून जास्त दूध उत्पादन व्हावे यासाठी सोनाई ग्रुपने उच्च प्रतीच्या पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या मका पिकाला योग्य बाजारभाव मिळतो तसेच त्वरित पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.याशिवाय शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी योग्य भाव मिळावा यासाठी 800 मेट्रिक टन क्रशिंग क्षमता असलेला सोलवंट प्लांट व रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे शेती व दुग्ध व्यवसाय यांचे एकत्रीकरण होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.सोनाई ग्रुपने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करणे, दुधाला योग्य बाजारभाव देणे, पशुपालनासाठी मार्गदर्शन करणे, पशुखाद्य पुरवठा करणे तसेच बँक व पतसंस्था यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला आहे. भविष्यातही शेतकरी, ग्राहक आणि कंपनी यांच्यातील विश्वास अधिक दृढ ठेवून शेतकऱ्यांना अधिकचा दर व नेहमीप्रमाणे वेळेवर पेमेंट दिले जाणार असल्याची ग्वाही दशरथ माने यांनी दिली.

–
शेतकऱ्यांना आवाहन – शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांचे व्यवस्थित पालन-पोषण करून, आधुनिकतेचा वापर करत शुद्ध व अधिक दूध उत्पादन करावे. कारण शेतीसोबत पशुपालन हा परिपूर्ण व्यवसाय असून, सोनाई ग्रुप शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीप्रमाणे उभा आहे.– दशरथ माने (सोनई ग्रूप प्रमुख)
![]()
One Response
एकच नंबर