इंदापूर येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम

जाहिरात

इंदापूर येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम

पर्यावरण पूरक साधनातून गणेशोत्सव,

मोबाईल व्यसनमुक्तीचा संदेश देत जपली सामाजिक बांधिलकी

इंदापूर ता.28

इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश उत्सव उपक्रमांतर्गत कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करत देखाव्याच्या माध्यमातून मोबाईल व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. ट्रस्टचा गणेशोत्सवाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला उपक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत लक्ष वेधून घेत आहे.

दरवर्षीप्रमाणे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या वर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अनोख्या पद्धतीने साजरा करत आहे. संस्थेच्या अध्यक्षा पद्माताई भोसले,सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे रक्षण आणि समाजप्रबोधन या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत, एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.

यामध्ये उत्सवासाठी गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आली आहे. हि मूर्ती संस्थेच्या जावेद हबीब अकॅडमी विभागातील विद्यार्थ्यांनी बनवली असून मूर्तीची सजावट करण्यासाठी कागदी प्लेट्स आणि विविध प्रकारच्या कागदांचा वापर करून एक आकर्षक, देखावा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गणरायाचे वस्त्र ट्रस्टच्या फॅशन डिझाइन विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे, ज्यामुळे बाप्पांचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

याबरोबरच या वर्षीच्या गणेशोत्सवाचा मुख्य विषय “मोबाईल व्यसनमुक्ती” आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजात निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत जनजागृती करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी गणेश मूर्तीसमोर मोबाईल व्यसनमुक्ती संदर्भातील देखावे ठेवले आहेत त्याच सोबत मोबाईल व्यसनमुक्तीवर आधारित विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान बुधवार (ता.27) रोजी ट्रस्टच्या कार्यालयात गणेश मूर्तीची विधिवत पूजा करीत स्थापना करण्यात आली.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर,ट्रस्टचे आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख भारत बोराटे,हमीद आतार यांचेसह ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप, प्रोजेक्ट ऑफिसर सागर कांबळे, जावेद हबीब विभाग प्रमुख अमोल राऊत, फॅशन डिझाइन विभाग प्रमुख त्रिशला पाटील, ब्युटी विभागाच्या रोहिणी जाधव,भारत माने उपस्थित होते.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!