
पाच वर्षे रोज नारळ फोडला तरी इंदापुरातील मंजूर झालेली विकास कामे संपणार नाहीत – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
पाच वर्षे रोज नारळ फोडला तरी इंदापुरातील मंजूर झालेली विकास कामे संपणार नाहीत – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
दगडवाडी येथील जागृत देवस्थान नंदिकेश्वराला श्रावणानिमित्त घातला सपत्नीक अभिषेक
इंदापूर ता.17
इंदापूर तालुक्यात पाच वर्ष रोज जरी उद्घाटन केली तरी मंजूर केलेली कामे संपणार नाहीत एवढी विकासकामे मी इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली आहेत.ही कामे केली म्हणजे मी जनतेवर उपकार केलेले नाहीत ते माझे कर्तव्य आहे.प्रस्थापितांना डावलून या तालुक्यातील जनतेने एका शेतकऱ्याच्या मुलाला संधी दिली एवढं मोठं पद मला मिळालं याची मला जाण आहे. कृषी खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार अशी ग्वाही राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री नंदिकेश्वराला सपत्नीक अभिषेक घालण्यात आला.
यावेळी बोलताना नामदार भरणे म्हणाले, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कृषी मंत्री पद मिळालं.या ठिकाणी नीरा नदीकाठी आपण पाच कोटी रुपये खर्चून संरक्षण भिंत बांधत आहे त्याचे भूमिपूजन आज झालं आहे. 2012 साली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर या भागात विकासाचा निधी दिला. त्यानंतर प्रत्यक्षेत्रात या परिसरात विकासाचा निधी देण्याचा प्रयत्न प्रमाणिकपणे केलाएखाद्या कामाचा शो जाहिरात पुढे पुढे समोर मीडियासमोर जायचं हे मला पहिल्यासमोर आवडत नाही. कृषिमंत्री झाल्यामुळे थोडसं मला तिथं पकडलं जातंय.जबाबदारी मोठी आहे याची जाणीव आहे.शेतकऱ्याच्या अडचणी प्रश्न समस्या काय आहेत हे मला माहित आहेत.
सकाळी उठल्यानंतर मला शेत दिसते झोपायला गेल्यानंतर शेत दिसतं. कुठले निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घेण हिताच आहे. याचा विचार मी करत असतो. मी नंदकेश्वराची शपथ घेऊन सांगतो माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे जे चांगले निर्णय असतील तो घेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे घेईल. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं राज्याच्या एवढ्या मोठ्या जे पद पहिल्या पाच पदांपैकी आहे. त्या पदा पर्यंत जाण्याचा योग मला मिळाला
पूर्वी मी क्रीडा मंत्री होतो त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जाता येत होतो भेटी देता येत होते पण आता मला समजून घ्या.मी सुखदुखात आलो नाही म्हणजे माझं प्रेम तुमच्यावर नाही असं नाही, पण माझ्यावर राज्यातील मोठी जबाबदारी आहे.एखाद्या कार्यक्रमात मी आलो काय ना आलो काय सुखदुःखात आलो काय न आलो काय तरी मला तुम्ही सर्वांनी समजून घ्या. मी तुमच्या प्रत्येक सुखदुखात आहे. मला साथ द्या सहकार्य करा. महाराष्ट्रात इतर तालुक्यात गावात जाण्यासाठी मला पाठिंबा द्या.
भरणे पुढे म्हणाले की,माझं सर्वांवर प्रेम मी सर्वांचा ऐकणारा कार्यकर्ता.मी कानाला लागणाऱ्याचं पण तेवढेच ऐकतो आणि न लागणाऱ्याच पण तेवढंच ऐकतो.मोठे लोक येथील जातील तुमच्याकडून काम करून घेतील सुखात तुमच्या येतील दुःखामध्ये फक्त तुमचा मामाच तुमच्या सोबत आहे हे पण आयुष्यात लक्षात ठेवा.मी पण माणूस आहे, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नाही टाकली तरी चालेल पण मार्गात काटे टाकू नका.विरोधकांना मला एवढंच सांगायचं आहे की मला शाब्बासकी देऊ नका पण माझ्या मार्गात काटे काचा टाकू नका मी कधी तुमच्यावर टीका टीपणी करणार नाही.या देवाला सुद्धाच कळतं कोण खरा आणि कोण खोट आहे.आपण जर नंदकिशोर समोर मनाने मस्तक टेकवलं तर तर तो सुद्धा आपल्याला पावतो याचं उत्तम उदाहरण तुमच्यासमोर मी आहे.
———-
लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळेच मी इथं बोलतोय…
माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती करतो की तुम्ही म्हणाल मामांचं आमच्याकडे लक्ष नाही,आरे लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळेच मी इथं बोलतोय.लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेत सहभागी होण्यात तारल आहे. लाडक्या बहिणीसाठी अजूनही काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्याचा भविष्यात प्रयत्न करूया असेही भरणे यांनी म्हटलं.राज्यात पाऊस पाणी चांगला पडत आहे अजून चांगला पडू दे, शेतातील पीक पाण्याचं उत्पादन चांगलं होऊ दे, त्याला चांगला बाजारभाव मिळू दे, हे आज मी नंदकेश्वराला साकडं घालतो.
दुधाळ कुटुंबाचे शेतीतील कार्य प्रेरणादायी आणि मार्गदर्शक – कृषिमंत्री भरणे…
सकाळी शेळगाव मध्ये गेलो होतो, बापूराव दुधाळ आणि त्यांचे बंधू यांच्या डाळिंब बागेत गेलो. आज त्यांचं डाळिंब एक्सपोर्टला जात आहे.190 दर मिळत आहे. शेतीमध्ये चांगलं कष्ट करत दहा एकरात त्यांना तीन कोटी रुपये मिळाले.दिवस उगवण्याच्या आत दुधाळ कुटुंब बागेत औषध फवारते, हे सोपं नाही. दुधाळांचे मागील 10 वर्षापासूनचे शेतीतील कष्ट हे नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. दुधाळांचा शेतीतील अनुभव आणि कामाच्या पद्धतीचे मार्गदर्शन घेत शेतकऱ्यांनी स्वतःची शेती भरावी ज्यामुळे शेतकऱ्यांना शुभेच्छा दिवस यायला खूप वेळ लागणार नाही. दुधाळ यांच्यासारख्या इतर कुटुंबाची देखील यशोगाथा मी ऐकणार आहे, एखादा शेतकरी कष्ट करतोय पण त्याला यश येत नाही मी त्याच्याकडे पण जाणार आहे.राज्याचा कृषी मंत्री म्हणून काय मदत करता येईल सहकार्य करता येईल तो प्रयत्न मी करणार आहे.
———
टीका टिपणीचे दिवस राहिले नाहीत आपण त्याही पुढे गेलो…
कोणावरही टीका टीपणी करण्याचे दिवस आता राहिले नाहीत आपण आता त्याही पुढे गेलो आहोत.राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठी जबाबदारी दिली आहे, मला जेवढी मदत करता येईल तेवढी करीन. काही गोष्टींमध्ये मला तुम्ही समजून घ्या सांभाळून घ्या. येणाऱ्या काळात निश्चित प्रकारे अजूनही सर्वसामान्य माणसासाठी चांगल्या गोष्टी करता येतील ते करणार आहे.

![]()