इंदापूर मध्ये भरत शहा मित्र परिवाराची दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

इंदापूरकरांनी अनुभवला हास्यजत्रेच्या कल्लोळासह दहीहंडीच्या थरार
भरत शहा मित्र परिवाराची दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वतंत्र्य व्यवस्थेमुळे महिलांनीही दहीहंडीत लुटला हास्यजत्रेचा आनंद
इंदापूर ता.19
इंदापूर शहरात भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने इंदापूरकरांनी हास्यजत्रेच्या कल्लोळासह दहीहंडीचाही थरार अनुभवला.यावेळी महिलांसाठी करण्यात आलेल्या स्वतंत्र व्यवस्थेमुळे दहीहंडी निमित्त आयोजित हास्यजत्रा कार्यक्रमाचा आनंद महिलांनाही घेत आला.यावेळी महात्मा फुले संघाने अत्यंत कौशल्यतेने सात मानवी मनोरे करून, शिताफिने दहीहंडी फोडली यावेळी जमलेल्या गोपाल भक्तांनी एकच जल्लोष केला.
इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या प्रांगणात सोमवार (ता.18) दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हास्य जत्रा फेम प्रसाद खांडेकर, रोहित माने, वनिता खरात, नम्रता सांभेराव या प्रमुख कलाकारांनी आपली कला सादर करत हास्यकल्लोळा भिजून टाकले.तर प्रसिद्ध सिनेस्टार आणि नृत्यांगना मीरा जोशी हिच्या बहारदार नृत्यविष्काराने महिलांसह लहानांपासून जेष्ठानपर्यंत ठेका धरला.यावेळी महात्मा फुले दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, शिवशंभो दहीहंडी संघ, व्यकटश दहीहंडी संघ, मालोजीराजे दहीहंडी संघ,स्वराज्य दहीहंडी संघ या सहा दहीहंडी संघांनी सहभाग घेतला प्रथम या सर्व संघाना सलामीला भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले.

त्यानंतर महात्मा फुले दहीहंडी संघाने सात थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला त्यांना इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनराध्यक्ष भरत शहा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,अविनाश घोलप, शहा ग्लोबल स्कुलचे विश्वस्त मुकुंद शहा, युवा उद्योजक अंगद शहा व मान्यवरांच्या हस्ते, महात्मा फुले दहीहंडी संघाला सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले. दरम्यान या सोहळ्याला इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, आबासाहेब फडतरे, अरविंद वाघ,देवराज जाधव,वसंत मोहोळकर, बाजार समितीचे सभापती तुषार जाधव,महारुद्र पाटील,वसंत मोहोळकर, रवींद्र सरडे, अमर गाडे, गजानन गवळी, अतुल शेटे पाटील, स्वप्निल राऊत, रघुनाथ राऊत, गोरख शिंदे,विनोद बाब्रस,धरमचंद लोढा, डॉ.संजय शहा,संजय दोशी, नितीन शहा, उदय शहा, पोपट पवार, अतुल व्यवहारे, मुकुंद शहा,अमोल शहा, इंदापूरच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, वैशाली शहा, रुचिरा शहा यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे आजी, माजी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचलन संतोष नरुटे व प्रतिभा पाटील यांनी केले.

दिग्गजांनी धरला ठेका…

या दहीहंडीच्या निमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्यासह अन्य मान्यवरांनी गोपाळ भक्तांच्या आग्रहाखातर डीजेच्या तालावर ठेका धरत उपस्थित त्यची मने जिंकली.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email
Don`t copy text!